Homeताज्या बातम्याकार्तिकी यात्रेनिमित्त १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान आळंदी-देहू परिसरात वाहतूक मार्गात बदल 

कार्तिकी यात्रेनिमित्त १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान आळंदी-देहू परिसरात वाहतूक मार्गात बदल 

(पुणे आळंदी प्रतिनिधी रवी कदम)

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे १२ ते २० नोव्हेंबर या कालावधीत भव्य यात्रा भरवण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक आळंदी येथे येऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा दर्शन सोहळा आणि दिंडी उत्सवात सहभागी होणार आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

१५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा तर १७ नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे १० ते १५ लाख भाविक आळंदी आणि देहू परिसरात येणार आहेत.

वाहतुकीवरील ताण लक्षात घेता पिंपरी-चिंचवड पोलिस वाहतूक शाखेने विविध मार्गांवर बंदी तसेच पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. विशेषतः जड व अवजड वाहनांना आळंदी परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

वाहतुकीतील महत्त्वाचे बदल :

मोशी चौक, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, चाकण आळंदी फाटा, माजगाव फाटा, भोसे फाटा या मार्गांवरून आळंदी कडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी.

कोयाळी, मरकळ, धानोरी फाटा, भोसरी, विश्रांतवाडी मार्गे पर्यायी व्यवस्था.

देहू कमान, कॅनबे चौक, देहूफाटा या परिसरातही जड वाहनांना प्रवेशबंदी.

देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

विशेष सूचना :

१२ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या काळात अत्यावश्यक सेवा व दिंडी वाहने वगळता इतर सर्व वाहनांना आळंदी शहरात प्रवेशबंदी राहणार आहे. पुणे-आळंदी, मोशी-आळंदी, चिंबळी-आळंदी, चाकण-आळंदी, वडगाव घेनंद-आळंदी आणि मरकळ-आळंदी हे प्रमुख रस्ते ठराविक ठिकाणी बंद राहतील.

भाविकांसाठी पार्किंगची सोय :

प्रशासनाने भाविकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

तळेकर पाटील चौक परिसरात दक्षिण व उत्तर दिशेला सुमारे तीन एकर क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

डुडुळगाव जकात नाका जवळ ज्ञानविलास कॉलेज परिसर, बोपदेव चौकातील मुंगसे पार्किंग, चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटल समोर तसेच वडगाव रोडवर २५ एकर क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतुकीतील हे बदल लक्षात घेऊन नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.                                                                                                 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘उलट लटकले, मला उपाशी ठेवले’: नोकरीच्या जाहिरातीच्या जाळ्यात पुण्याचा माणूस म्यानमारमधील सायबर गुलामगिरीतून कसा...

0
AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे : दोन महिने बंदिवासात राहिल्यानंतर साहिलने लढाईसाठी स्वत:ला तयार केले. एक दिवस आधी त्याने आपल्या...

हुच कारखाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी : आठवले

0
पुणे : बेकायदेशीर हुच निर्मिती युनिट्स कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...

इंद्रायणी नदीच्या अपघातात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा बुडून मृत्यू

0
पुणे : इंद्रायणी नदीत शनिवार आणि रविवार दरम्यान शिरगाव, कुंड माळा आणि देहूजवळील वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जण बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.पहिल्या...

शेतकऱ्याची २ लाख रुपयांची फसवणूक करण्यासाठी चोरीला गेलेला फोन

0
पुणे : थेऊर येथील नायगाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या वाहनातून मोबाईल फोन चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा लोणी काळभोर पोलीस शोध घेत आहेत आणि नंतर...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 2 फ्लाइटला 7 तास उशीर झाल्याने 200 हून अधिक प्रवाशांना त्रास...

0
एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पुणे : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दोन स्वतंत्र उड्डाणे IX-2913 आणि IX-1098 - शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री सात तासांपेक्षा जास्त...

Translate »
error: Content is protected !!