प्रसिद्धीसाठी बातमी (रवी कदम)
कसबे तडवळे (ता. जि. धाराशिव):
युवासेना महाराष्ट्र राज्याच्या उपसचिव मा. मनिषा वाघमारे या येत्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करत असून, त्या निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशी चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे.
मनिषा वाघमारे या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेच्या उपसचिव पदावर कार्यरत असून, त्यांची ओळख राज्य आणि देशभरात सक्रिय, समाजाभिमुख आणि जनतेशी घट्ट नाळ असलेल्या नेत्या म्हणून आहे.
कोरोना संकट काळात तसेच पूरस्थितीच्या काळात त्यांनी पूरग्रस्त आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. तसेच कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे धाराशिवसह राज्यातील अनेक युवकांना रोजगार मिळाला.
युवासेनेच्या माध्यमातून खेडोपाडी युवकांचे संघटन वाढवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. सुशिक्षित, सामाजिक बांधिलकी असलेले युवा नेतृत्व घडावे, यासाठी मनिषा वाघमारे प्रयत्नशील आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीबाबत सर्वसामान्य जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षप्रमुख आणि स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























