Homeताज्या बातम्या"शाळेचे संस्कार, यशाची शिडी! 1999-2025 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

“शाळेचे संस्कार, यशाची शिडी! 1999-2025 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

**(ता खेड रवि कदम.) येथे स्थित श्री रेणुका माध्यमिक विद्यालय, रासे येथे 1999 ते 2025 या सर्व बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षकांनी मनापासून केले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली. यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व प्रार्थनेनंतर स्नेहमेळाव्याचा वर्ग रंगात आला.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा वाळुंज (बोऱ्हाडे), संजीव भोर, संजयकुमार पिचके, संतोष काळे, कल्पना गायकवाड, माजी शिक्षक सतिश मुंगसे, आनंदा डावरे, नाईकवडी सर, शिक्षकेत्तर कर्मचारी शारदा मुंगसे, वसंत मुंगसे, नितीन कडलक, राजेंद्र शिंदे, संदीप पाटील आदींचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, रोप व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

अनेक वर्षांनी विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या शाळेत भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि संपूर्ण परिसर आनंदाने उजळून निघाला.

या सोहळ्यात राहुल आपस्तंबे, कांचन शिंदे, काजल वाडेकर, मयुर मुंगसे, अर्चना मुंगसे, रोहिणी गाडे, पल्लवी मायणे, सारिका वाडेकर, डॉ. श्रुतिका डावरे, निखिल डावरे, अमृता शिंदे, लक्ष्मण शिंदे, धनंजय मुंगसे, अनिकेत केदारी, स्वप्नील कड, गणेश शिंदे, गणेश केदारी, किरण ठाकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी विद्यालयाने दिलेल्या संस्कार व शिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी सांगितले की,

“आज आम्ही जीवनात चांगल्या पदावर, चांगल्या परिस्थितीत आहोत. यासाठी आमच्या शाळेचा आणि शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.”

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेत

✅ शाळेची मोठी इमारत व्हावी

✅ डिजिटल सुविधा वाढवाव्यात

या उपक्रमांत योगदान देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिक्षक संजयकुमार पिचके, आनंदा डावरे, सतिश मुंगसे, दरेकर सर व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णा वाळुंज यांनीही मनोगत व्यक्त केले.

शिक्षकांनी सर्व जुन्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत सांगितले,

“तुमची प्रगती हेच आमच्या कार्याचे खरे फळ.”

कार्यक्रमात गंमतीजमती, सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजनाचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रांत शिंदे, शिवाजी शिंदे, सुजीत डावरे, शुभम मुंगसे, नितीन मुंगसे, सुहास केदारी आदींच्या सोबत प्रत्येक बॅच प्रमुखांनी मोलाची भूमिका निभावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल वाडेकर व पल्लवी मुंगसे यांनी केले.

आनंद, उत्साह व भावनिक वातावरणाने नटलेला हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून सिमकार्ड चोरणाऱ्या सिव्हिल इंजी.ला अटक

0
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये चार्जिंगसाठी ठेवलेल्या प्रवाशांच्या मोबाईलमधून सिमकार्ड चोरल्याप्रकरणी २३ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरला अटक करण्यात आली, अशी माहिती...

आळेफाटा येथे ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ संस्कारक्षम उपक्रमाचा हरिनामाच्या गजरात शुभारंभ

0
मानव मित्र न्यूज | प्रतिनिधी माऊली घुंडरे|आळंदी आळंदीतून सुरू झालेल्या ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या संस्कारक्षम शैक्षणिक उपक्रमाचा विस्तार आता ग्रामीण भागातही होत असून, श्रीक्षेत्र आळेफाटा,...

टेचीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; पती आणि सासूवर गुन्हा दाखल

0
पुणे : माणिकबाग परिसरात गुरुवारी दुपारी एका २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.मृताच्या भावाने सिंहगड रोड पोलिसांकडे दिलेल्या...

बेकायदेशीर डंपिंगसाठी पीएमसीने दोन वर्षांत 1,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला

0
मुठा नदीपात्रात कचरा पुणे : नागरी संस्थेने, गेल्या दोन वर्षात, नाले, मोकळे भूखंड आणि नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे बांधकाम आणि विघटन कचरा टाकल्याबद्दल 1,170...

स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

0
पुणे : 8 जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीसाठी हजारो वारकऱ्यांना सुरक्षित आणि निर्विघ्न यात्रेची खात्री करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने...

Translate »
error: Content is protected !!