Homeताज्या बातम्याआळेफाटा येथे ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ संस्कारक्षम उपक्रमाचा हरिनामाच्या गजरात शुभारंभ

आळेफाटा येथे ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ संस्कारक्षम उपक्रमाचा हरिनामाच्या गजरात शुभारंभ

मानव मित्र न्यूज | प्रतिनिधी माऊली घुंडरे|आळंदी
आळंदीतून सुरू झालेल्या ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या संस्कारक्षम शैक्षणिक उपक्रमाचा विस्तार आता ग्रामीण भागातही होत असून, श्रीक्षेत्र आळेफाटा, आळेगाव तसेच खराबवाडी येथील शाळांमध्ये हरिनामाच्या गजरात या उपक्रमाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम नव्हे, तर सुशिक्षित, सुसंस्कृत आणि संस्कारक्षम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशतात्या काळे, तुकाराम अण्णा गवारी, प्रा. श्रीधर घुंडरे, निघोजे शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख काळुराम येळवंडे, ह.भ.प. प्रल्हाद महाराज भोईभार यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, संस्था चालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर वस्ती (आळे), श्री ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (आळे), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (आळे), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (आळेफाटा), श्री ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (आळे) तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी (ता. खेड) अशा सहा शाळांमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आजच्या आधुनिक काळात नैतिक मूल्ये, चारित्र्य संवर्धन आणि संस्कारक्षम शिक्षणाची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समित्या, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शालेय शिक्षणासोबत संस्कारांची जोड मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी शाळांना संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा, संस्कारक्षम ग्रंथसंपदा भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना हरिपाठाचे वाटप करून हरिनामाच्या गजरात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे संतोष दिघे यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
📍 फोटो कॅप्शन : आळेफाटा येथील शाळेत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ संस्कारक्षम उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मान्यवरांकडून संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा व संस्कार साहित्य शाळेला भेट देताना.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टेचीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; पती आणि सासूवर गुन्हा दाखल

0
पुणे : माणिकबाग परिसरात गुरुवारी दुपारी एका २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.मृताच्या भावाने सिंहगड रोड पोलिसांकडे दिलेल्या...

बेकायदेशीर डंपिंगसाठी पीएमसीने दोन वर्षांत 1,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला

0
मुठा नदीपात्रात कचरा पुणे : नागरी संस्थेने, गेल्या दोन वर्षात, नाले, मोकळे भूखंड आणि नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे बांधकाम आणि विघटन कचरा टाकल्याबद्दल 1,170...

स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

0
पुणे : 8 जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीसाठी हजारो वारकऱ्यांना सुरक्षित आणि निर्विघ्न यात्रेची खात्री करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने...

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

0
एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

28 जून रोजी AI देखरेख आणि बायोमेट्रिक स्क्रीनिंग अंतर्गत 6 लाखांहून अधिक उमेदवार MahaTET...

0
पुणे: राज्यभरातील सहा लाखांहून अधिक शिक्षक अभूतपूर्व सुरक्षेखाली 28 जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (MahaTET) बसतील.गैरप्रकारमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी, अधिकारी कृत्रिम...

Translate »
error: Content is protected !!