बातमी मानवमित्र न्यूज संपादक रोहिदास कदम
पावसाळ्यात दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव; डेंग्यूसह साथीच्या आजारांचा धोका वाढल
केळगाव (ता. खेड, जि. पुणे): स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावूनही प्रत्यक्षात कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र केळगाव येथे पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीने “येथे कचरा टाकू नये” असा इशारा देणारा फलक लावला असला तरी त्याच फलकासमोर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे.
‘स्वच्छ सुंदर केळगाव’चा दावा करणाऱ्या ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत असून परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नागरिकांनी ग्रामपंचायतीने तातडीने हा कचरा हटवून नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, फॉगिंग करावी तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या योग्य ठिकाणी कचरा टाका नागरिकांची जबाबदारी आहेआरोग्याशी खेळ करणाऱ्या या दुर्लक्षाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करीत आहे”फलकावर ‘कचरा टाकू नका. खाली मात्र कचऱ्याचा डोंगर! केळगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड!”
दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव; डेंग्यूच्या धोक्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप
पोस्टरवरील ठळक मजकूर:
❌ स्वच्छतेचे दावे फोल!
❌ कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
❌ पावसाळ्यात साथीच्या आजारांची भीती
❌ प्रशासन कधी जागे होणार?
मानव मित्र न्यूज | जनतेचा आवाज. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























