Homeताज्या बातम्याआळंदीचा दुहेरी गौरव! राजेंद्र उमाप यांचा विक्रमी विजय, डॉ. भावार्थ देखणे यांना...

आळंदीचा दुहेरी गौरव! राजेंद्र उमाप यांचा विक्रमी विजय, डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित पुरस्कार आळंदी, चरित्र समितीची वतीने

आळंदी, दि. १३ जून (प्रतिनिधी रोहिदास कदम): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरी आळंदीच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त तथा पालखी प्रमुख अँड राजेंद्र उमाप यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजय मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे आळंदीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे सदस्य व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भावार्थ देखणे यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा “उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार – २०२४,२०२५ जाहीर झाल्याने आळंदीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर पडली आहे. या दोन्ही मान्यवरांच्या यशामुळे आळंदी, संस्थान समिती आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या यशाबद्दल आयोजित अभिनंदन सोहळ्यात ओळख ज्ञानेश्वरी परिवाराचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे, अजित वडगावकर, शाकंभरी पाटील, राम मंदिर विश्वस्त अर्जुन मेदनकर, विलास वाघमारे, चंद्रकांत मोरे, आव्हळे, रोहिदास कदम हे हभप प्रल्हाद माऊली संस्थानचे माजी विश्वस्त अभय टिळक, ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त चैतन्य लोंढे, कबीर बुवा व निरंजननाथ योगी, सासवडचे विश्वस्त गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक नवीन शाळा आणि शैक्षणिक संस्था लवकरच ओळख ज्ञानेश्वरी परिवाराशी जोडल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भात बोलताना माजी विश्वस्त अभय टिळक यांनी सांगितले की, परिवाराशी संलग्न शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांचे एकदिवसीय संमेलन आयोजित करून त्यांना ज्ञानेश्वरीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील गावागावांत आणि घराघरांत संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार पोहोचविण्याचे कार्य ओळख ज्ञानेश्वरी परिवार सातत्याने करत असून, समाजप्रबोधनाची ही संकल्प अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी...

विकासक निवडक पुरवठा आणत असल्याने पुण्यातील कार्यालयाच्या रिक्त जागा कमी होत आहेत

0
पुणे : मार्केटमध्ये मर्यादित नवीन पुरवठ्यामुळे पुण्यातील रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण जानेवारी ते जून दरम्यान कमी झाले. नाइट फ्रँक इंडियाच्या म्हणण्यानुसार, शहरातील...

फलकावर ‘कचरा टाकू नका’… पण प्रत्यक्षात कचऱ्याचे साम्राज्य! केळगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप”

0
बातमी मानवमित्र न्यूज संपादक रोहिदास कदम पावसाळ्यात दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव; डेंग्यूसह साथीच्या आजारांचा धोका वाढल केळगाव (ता. खेड, जि. पुणे): स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावूनही...

Translate »
error: Content is protected !!