Homeताज्या बातम्याहिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

पुणे | मानव मित्र न्यूज रविदास कदम
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान कथितरित्या माओवादी नेता हिडमा मडावी याच्याशी संबंधित गाण्यावर नृत्य सादर केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांच्या वतीने (ॲड अभिषेक रंधवे,) श्वेतल वहाणे आणि श्रेयश बापटे यांनी न्यायालयात बाजू मांडली. संबंधित गाणे युट्यूबवर उपलब्ध असून विद्यार्थ्यांचा कोणताही देशविरोधी अथवा बेकायदेशीर विचारसरणीचा प्रचार करण्याचा हेतू नव्हता, असा युक्तिवाद करण्यात आला.
दरम्यान, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संबंधित विद्यार्थ्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. गाण्यातील उल्लेख आणि त्यामागील नक्षलवादी संदर्भाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असा दावा त्यांनी केला. “हिडमा” किंवा “भीमा” या शब्दांचा संदर्भ एखाद्या पर्वताशी संबंधित असल्याचे आम्हाला वाटत होते. कोणत्याही दहशतवादी किंवा नक्षलवादी विचारसरणीचे समर्थन करण्याचा अथवा प्रचार करण्याचा आमचा हेतू नव्हता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
तपास अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली नसल्याची नोंद घेत न्यायालयाने प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांतील सादरीकरणे, त्यामागील आशय आणि विद्यार्थ्यांची जागरूकता यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
“हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; विद्यार्थ्यांचा ‘हेतू नव्हता’ दावा, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर:
विश्रांतवाडीतील गुन्हा प्रकरण; प्रत्येकी ३० हजारांच्या जातमुचलक्यावर दिलासा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

Translate »
error: Content is protected !!