Homeताज्या बातम्याज्ञानेश्वर महाराज संस्थानचा भोंगळ कारभार की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?; आळंदीत संशयाचे वातावरण

ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा भोंगळ कारभार की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?; आळंदीत संशयाचे वातावरण

नोटिसा चार जणांना, खुलासे कुठे? नावे गुप्त ठेवण्यामागचे कारण काय, नागरिकांचा सवाल
आळंदी, दि. ४ (प्रतिनिधी सचिन शिंदे)संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील चोरी प्रकरणानंतर संस्थान प्रशासनाने चार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून लेखी खुलासे मागविले होते. त्यानंतर काहींवर निलंबन, सेवा समाप्ती आणि ताकीद स्वरूपाची कारवाई जाहीर करण्यात आली. मात्र संबंधितांची नावे, त्यांनी दिलेले वैयक्तिक खुलासे आणि कारवाईमागील नेमकी कारणे अद्यापही गुप्त ठेवण्यात आल्याने आळंदीत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या मते, प्रत्येक संबंधित व्यक्तीला स्वतंत्र नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येकाने दिलेला खुलासा वेगळा असणे स्वाभाविक आहे. मात्र विश्वस्त मंडळाने केवळ कारवाईची घोषणा केली, पण संबंधितांनी नेमके काय स्पष्टीकरण दिले, कोणाचा खुलासा ग्राह्य धरला गेला, कोणाचा फेटाळला गेला आणि त्यामागील कारणे काय होती, याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भाविकांच्या देणग्या आणि मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित गंभीर प्रकरणात संपूर्ण माहिती जनतेपासून दूर ठेवली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “जर सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडली असेल, तर संबंधितांची नावे आणि त्यांचे खुलासे जाहीर करण्यास अडचण काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणात संस्थान प्रशासनाने अधिक स्पष्ट भूमिका घेत सर्व तथ्ये जनतेसमोर मांडावीत, अन्यथा हा केवळ भोंगळ कारभार आहे की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, अशा चर्चांना आणखी खतपाणी मिळू शकते, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. ‌.
दरम्यान, चोरी प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून तपासातून सत्य का असत्य परिस्थिती समोर येणार आहे. मात्र तपासाला बाधा न आणता उपलब्ध प्रशासकीय माहिती, नोटिसा, खुलासे आणि कारवाईची कारणमीमांसा जाहीर केल्यास भाविकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्लेसमेंट अधिकारी वाढत्या आयटी जॉब घोटाळ्यांबद्दल दक्षता वाढवतात

0
कंपन्या दरवर्षी डिसेंबरपासून प्लेसमेंट-संबंधित विनंत्यांसाठी अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांशी संपर्क साधतात पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्लेसमेंट अधिका-यांनी कथित फसव्या भरती मोहिमेची मालिका आणि त्यांच्या...

घोषणेनंतर चार वर्षांनी, रांजणगाव येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमध्ये पायाभूत कामांना वेग आला

0
297 एकरांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात एकूण 492 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यामध्ये MIDC 285 कोटी आणि केंद्राचा 208 कोटी रुपयांचा वाटा आहे. पुणे...

आषाढी वारीच्या तयारीला वेग; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची आळंदीत नियोजन बैठक

0
आळंदी | प्रतिनिधी सचिन शिंदे आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आळंदीतील तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी गुरुवारी संत ज्ञानेश्वर...

आयटी फर्मच्या हिंजवडी शाखेने प्रोजेक्टशिवाय अनेक फ्रेशर्सना कामावर घेतले, सरकारच्या आयटी कॉन्ट्रॅक्टवर डोळा: हिंजवडी...

0
सीईओला मंगळवारी त्यांच्या नाशिकमधील आडगाव येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि रात्री त्यांना पुण्यात आणण्यात आले, त्यानंतर बुधवारी फसवणूक प्रकरणात त्यांना औपचारिक अटक...

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

0
पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

Translate »
error: Content is protected !!