बातमी (प्रतिनिधी अशोक कुंभार)| पंढरपूर विकासाला गती
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेत अखेर पंढरपूर कॉरिडॉरला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ शिखर बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सुमारे ₹४००० कोटींच्या भव्य आराखड्याला हिरवा कंदील देण्यात आला असून, भाविकांना अधिक सोयी-सुविधा देण्यासाठी हा कॉरिडॉर उभारला जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुप्रिया पवार यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात भूसंपादन, रस्ते, दर्शन व्यवस्था आणि मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. आमदार समाधान आवताडे यांनी ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
👉 लवकरच कामाला सुरुवात होणार असून, पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याचा सरकारचा मानस आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























