(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार).-
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक ग्राहक थेट लाईनमन किंवा वीज कर्मचाऱ्यांना फोन करतात. मात्र, यामुळे कामात अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढू शकतो, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी थेट फोन करण्याऐवजी अधिकृत माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचारी तांत्रिक दुरुस्तीच्या कामात व्यस्त असतात. अशावेळी वारंवार फोन आल्यास कामात व्यत्यय येतो. त्यामुळे ग्राहकांनी १० ते १५ मिनिटे प्रतीक्षा करून तक्रार नोंदवावी, असे सांगण्यात आले आहे.
२४ तास टोल-फ्री सेवा उपलब्ध
ग्राहकांच्या तक्रारींसाठी महावितरणचे खालील टोल-फ्री क्रमांक २४ तास कार्यरत आहेत —
📞 1800-233-3435
📞 1800-212-3435
📞 1912

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























