Homeताज्या बातम्यामरकळ येथे ‘श्री केशवराज महाराज करंडक’ लोकनृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

मरकळ येथे ‘श्री केशवराज महाराज करंडक’ लोकनृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

आळंदी (रवी कदम) :
मरकळ येथील श्री केशवराज शिक्षण संस्थेच्या पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आधुनिक काळात लोकनृत्याची परंपरा जपली जावी व ती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेली ‘श्री केशवराज महाराज करंडक लोकनृत्य स्पर्धा’ यंदा पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात पार पडली.
शाळेचे प्राचार्य मिलिंद नखाते व सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून आणि उत्कृष्ट नियोजनातून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १२ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांत घेण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक : अ‍ॅपेक्स इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली
द्वितीय क्रमांक : नवीन माध्यमिक विद्यालय, मरकळ
तृतीय क्रमांक : पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूल, मरकळ
लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक : किड्स पॅराडाईज स्कूल, आळंदी
द्वितीय क्रमांक : लर्निंग ट्री स्कूल, वराळे
तृतीय क्रमांक : पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूल, मरकळ
बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. प्रथम क्रमांकासाठी ५,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३,००० रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २,००० रुपये रोख व करंडक असे पारितोषिक देण्यात आले.
मोठ्या गटासाठीचे बक्षीस मरकळ गावचे सरपंच हनुमंत लोखंडे यांनी, तर लहान गटासाठीचे एकूण १०,००० रुपयांचे बक्षीस उद्योजक जयसिंगराव लोखंडे यांनी दिले.
या कार्यक्रमास श्री केशवराज शिक्षण संस्थेचे सचिव राहुल जनार्धन शिंदे, स्नेहा प्रीकास्टचे डायरेक्टर प्रवीण चौधरी, संचालक तुकाराम वहिले, खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक किरण लोखंडे, उपसरपंच बाळासाहेब लोखंडे, संचालक शंकरभाऊ लोखंडे, एकनाथ वरपे, नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या छाया लाटे, पर्यवेक्षक शंकर जाचक, तसेच विभागप्रमुख व नवीन उच्च माध्यमिक विद्यालयाचे संतोष आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूलने या लोकनृत्य स्पर्धेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरकारी जमिनीवरील वादांना आता स्थानिक पातळीवर तोडगा!

0
(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम ) राज्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारांमधील शर्तीभंग प्रकरणांवर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक...

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

0
पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

पिंपरी-चिंचवड हादरलं भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १६ राऊंड फायरिंग

0
,(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार ,) पिंपरी-चिंचवड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. देहूरोड परिसरातील सवाना चौकात रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ता...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

0
पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

Translate »
error: Content is protected !!