Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ : नामनिर्देशन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ : नामनिर्देशन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन पत्रकार परिषद

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ : नामनिर्देशन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन
राजगुरुनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करताना संबंधित कायदे व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती तसेच नागरिकांच्या मागासवर्गीय (ओबीसी) यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय (जात प्रमाणपत्र पडताळणी) नियम, २००० मधील तरतुदीनुसार जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) जोडणे आवश्यक आहे.
उमेदवार कोणत्या गट किंवा गणातून निवडणूक लढवत आहे, त्या गटातील किंवा गणातील मतदार असणे बंधनकारक नाही. मात्र संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही गट किंवा गणाच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. तथापि, उमेदवाराचा सुचक (प्रस्तावक) हा त्याच गटातील व गणातील मतदार असणे अनिवार्य आहे.
एकाच व्यक्तीने एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर सुचक किंवा अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनामत रक्कम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे —
सर्वसाधारण प्रवर्ग :
जिल्हा परिषद – ₹१,०००
पंचायत समिती – ₹७००
अनुसूचित जाती :
जिल्हा परिषद – ₹५००
पंचायत समिती – ₹३५०
अनुसूचित जमाती :
जिल्हा परिषद – ₹५००
पंचायत समिती – ₹३५०
नागरिकांचा मागासवर्गीय (ओबीसी) :
जिल्हा परिषद – ₹५००
पंचायत समिती – ₹३५०
ही अनामत रक्कम नामनिर्देशन पत्र सादर करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा संबंधित विभक्ती अधिकारी यांच्याकडे जमा करून त्याची पावती प्राप्त करणे व ती पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे बंधनकारक आहे.
राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबाबत नमुना २-अ जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. संबंधित पत्र सादर करताना त्याची पोच घेणे बंधनकारक असून ही पोच लेखी स्वरूपात असावी. सदर पोचाची छायांकित प्रत संबंधित राजकीय पक्षाने आपल्या उमेदवाराला देणे आवश्यक आहे.
नामनिर्देशन पत्रे दि. १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, राजगुरुनगर यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. मात्र दि. १८ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असा आदेश विभागीय अधिकारी, खेड उपविभाग श्री. दौडे तसेच तहसीलदार श्री. प्रशांत बोडशे यांनी दिला आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी वरील सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

Translate »
error: Content is protected !!