Homeताज्या बातम्याआळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा पांढऱ्या फेसाने फेसाळली; नागरिक संतप्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ...

आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा पांढऱ्या फेसाने फेसाळली; नागरिक संतप्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ बघ्याच्या भूमिकेत

आळंदी (रवी कदम):
तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांची श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी वाढत्या जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा पांढऱ्या फेसाने फेसाळली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून थेट रसायन व मैला मिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले असून भाविक, वारकरी व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडा-रोडा, कचरा टाकला जात असून पुलांच्या बांधकामावेळी पडलेला मलबा अद्याप न काढल्याने नदीचे पात्र अरुंद होत आहे. पूर नियंत्रण रेषेत सुरू असलेल्या बांधकामांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व आळंदी नगरपरिषद केवळ नदीकाठ विकासावर भर देत असून प्रत्यक्ष नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याने “नदी स्वच्छ न करता विकास कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जय गणेश मंदिर परिसर, स्मशानभूमी भाग व विविध घाट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच श्री स्वामी महाराज घाटाजवळील पुलाखालील भुयारी मार्ग (सब-वे) अद्याप वापरास न दिल्याने भाविकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे आळंदी नगरपरिषदेला भामा-आसखेड धरणातून पाणी मागवावे लागले असून जलशुद्धीकरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. नदीवरील पाणी साठवण बंधाऱ्यांची दुरवस्था व गळतीमुळे पाणी साठवणीत अडचणी येत आहेत.
नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदने देऊन नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र पुणे जिल्हा प्रशासन व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!