सासवड प्रतिनिधी अशोक कुंभा/ आदरणीय सुनिल सिताराम जगताप साहेब यांना मिळालेल्या मानाच्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक व हार्दिक अभिनंदन! 🌸
बौद्धविकास तरुण सुपे खुर्द मंडळाचे सचिव, बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे प्रदेश खजिनदार, पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीचे विश्वस्त, तसेच सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी म्हणून समाजासाठी केलेल्या प्रदीर्घ व निष्ठावान कार्याची दखल घेऊन,
आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन, ह्युमन राईट्स अँड अँन्टी करप्शन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने
दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार) यांच्या शुभहस्ते,
मुंबई जिल्हा न्यायाधीश मा. सादिक अली सय्यद,
रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश केदारी,
आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनचे मनोज गवई
यांच्यासह विविध राज्यांतील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत
“भारत भूषण” राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले—ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
आपल्या कार्याला मिळालेली ही पावती समाजातील अनेकांना प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























