Homeताज्या बातम्यामेदनकरवाडीत श्री खंडोबा देवस्थानात रथसप्तमी उत्साहात साजरी

मेदनकरवाडीत श्री खंडोबा देवस्थानात रथसप्तमी उत्साहात साजरी

रथसप्तमी उत्साहात साजरी
मेदनकरवाडीत रथसप्तमी परंपरेने व भक्तिभावात साजरी
आळंदी (रविदास कदम); मेदनकरवाडी येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये रथसप्तमी निमित्त पारंपरिक धार्मिक विधी, पूजा-अर्चा व विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह रथसप्तमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथसप्तमीच्या निमित्ताने श्री खंडोबा महाराजांचा पुष्पसजावटीने सजवलेला वैभवी मानाचा गाडा विधीवत पूजन करून भंडारा वाहण्यात आला.
पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत श्रींची पूजा-अर्चा, आरती व देवाच्या पदांचे गायन सुरू होते. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शिस्तबद्ध रांगेत हजारो भाविकांनी श्री खंडोबा महाराजांचे तसेच मानाच्या गाड्याचे दर्शन घेतले.
मेदनकरवाडीतील श्री खंडोबा महाराजांचे सेवेकरी म्हणून चऱ्होली, कुरूळी व चाकण परिसरातून मानकरी उपस्थित राहतात. राज्यभरातून भाविक नवसासाठी येथे येत असून “नवसाला पावणारा देव” अशी श्रींची ख्याती आहे.
मंदिराचे सेवेकरी अरुण तोडकर व ग्रामस्थांच्या सहभागातून रथसप्तमी ते माघ पौर्णिमा या कालावधीत परंपरेनुसार नित्यपूजा केली जाते. रथसप्तमीच्या दिवशी पूजा व आरतीनंतर भाविकांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले. तसेच रथसप्तमी ते माघ पौर्णिमा या नऊ दिवसांत मानाच्या गाड्याला पाणी घालण्याची परंपरा भक्तिभावाने पाळली जाते.
रथसप्तमी निमित्त मंदिरासमोर बैलगाडा पूजन करण्यात आले. मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थान हे राज्यात परिचित व प्रसिद्ध श्रीक्षेत्र असून, या पवित्र दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रथा-परंपरांचे पालन करत श्रींचे दर्शन घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमा स्टार्टअप OneCircle लहान शहरांमधील ग्राहकांना लक्ष्य करते | पुणे बातम्या

0
पुणे: ग्राहकांच्या दारात विम्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पॉइंट ऑफ सेल्स व्यक्तींचे नेटवर्क लहान शहरे आणि ग्रामीण भागात तैनात केले जात आहे. वनसर्कल इन्शुरन्स...

क्रेडीट कोऑप सोसायटीची ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पुणे बातम्या

0
पुणे : बनावट सोने कर्ज खाती तयार करून सोसायटीला ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी पत सहकारी संस्थेचे व्यवस्थापक, लेखा परीक्षक...

मित्रावर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली पुणे बातम्या

0
पुणे : मित्रावर चाकूने वार करून दुसऱ्याला जखमी केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी शनिवारी एका ३० वर्षीय तरुणाला अटक केली.ही घटना खेड तालुक्यातील येलवाडी गावात...

पुण्यात उष्ण रात्री पहायला सुरुवात होईल: IMD | पुणे बातम्या

0
पुणे: येत्या काही दिवसांत शहराच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होणार असून, जानेवारी महिन्यातील थंडी संपुष्टात येईल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी सांगितले.शहराच्या किमान...

सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा द्वितीय वर्धापन दिन दादा-दादी पार्क येथे उत्साहात साजरा

0
तळेगाव दाभाडे (रविदास कदम) : सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता तळेगाव दाभाडे येथील दादा-दादी...

Translate »
error: Content is protected !!