शिरवळ.(अशोक कुमार प्रतिनिधी) (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील केदारेश्वर महादेव मंदिर – श्रद्धा आणि इतिहासाचे संगमस्थान
शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे वसलेले केदारेश्वर महादेव मंदिर हे पांडवकालीन आणि अतिशय प्राचीन असे सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. या मंदिराला शतकानुशतके धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.
या मंदिराच्या समोर राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, हा पुतळा शिवभक्तांसाठी प्रेरणास्थान ठरतो. परिसर अतिशय शांत, निसर्गरम्य आणि पवित्र वातावरणाने नटलेला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. विशेषतः महाशिवरात्री, श्रावण महिना व सोमवारच्या दिवशी येथे अभिषेकासाठी हजारो भक्त दूरदूरवरून दर्शनासाठी येतात. भाविक येथे येऊन भगवान शंकराच्या अभिषेकातून आत्मिक शांती, समाधान आणि आनंद अनुभवतात.
आधुनिक काळातही या मंदिराची वैभवशाली परंपरा तितक्याच भक्तीभावाने जपली जात आहे. ऐतिहासिक परंपरा आणि वर्तमान श्रद्धेचा हा सुंदर संगम म्हणजेच शिरवळ येथील केदारेश्वर महादेव मंदिर.
हे मंदिर आजही भक्तांसाठी आस्थेचे, श्रद्धेचे आणि आत्मिक समाधानाचे केंद्र बनले आहे. 🙏.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























