Homeताज्या बातम्यापुरंदरमध्ये लग्नसोहळ्यात अन्नातून विषबाधा; ६२ जण बाधित, प्रशासन सतर्क

पुरंदरमध्ये लग्नसोहळ्यात अन्नातून विषबाधा; ६२ जण बाधित, प्रशासन सतर्क

पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे पानवडी येथे पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यात जेवणातून विषबाधेची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल ६२ पाहुण्यांना त्रास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसोहळ्यानंतर जेवण घेतलेल्या पाहुण्यांना काही वेळातच उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या लक्षणांचा त्रास सुरू झाला. विशेषतः रबडी(मिठाई) आणि गुलाबजाम खाल्ल्यानंतर अनेकांना प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती गंभीर होताच स्थानिक आरोग्य यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि बाधितांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या २४ रुग्णांची प्रकृती स्थिर असून उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संबंधित केटरिंग व्यवस्था आणि आयोजकांची चौकशी सुरू करण्यात आली असून निष्काळजीपणाचा तपास केला जात आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि साठवण याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
घटनेमुळे प्रश्न उपस्थित
या प्रकारामुळे लग्नसमारंभातील अन्न सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवले पुलाजवळ तीन वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी

0
पुणे : कात्रज-देहू रोड बायपासवर नवले पुलाजवळ सोमवारी सकाळी 8.05 च्या सुमारास तीन वाहनांच्या धडकेत 22 वर्षीय पिकअप व्हॅन चालक जागीच ठार झाला तर...

प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवणार – (लोणीकर )यांची ग्वाही

0
<प्रतिनिधी | मंठा गजानन राजभिंडे पाटील) “शासनाच्या योजना या केवळ कागदावर राहण्यासाठी नसून त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहेत. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून...

पुणे विमानतळाचे नवीन सुरक्षा क्षेत्र 95% पूर्ण झाले आहे परंतु ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी 2-3...

0
पुणे: शहरातील विमानतळाच्या नवीन सुरक्षा क्षेत्राचे 95% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, परंतु प्रवाशांना ही सुविधा कार्यान्वित होण्यासाठी जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा...

‘कपडे भरून गळफास घेतला’: पुण्यातील बालिका बलात्कार-हत्या प्रकरणातील मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात उघड, पोलिसांचे...

0
पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याचे पोलिसांनी मंगळवारी...

महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून पित्याने 2 मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला

0
बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी...

Translate »
error: Content is protected !!