(बातमी पुणे अशोक कुंभार) : पुणे स्वारगेट एसटी स्टँडच्या मागे घाणीचा कॅनल; आजारपणाचा धोका वाढला.
पुणे एसटी स्टँडच्या पाठीमागे सातारा रोडवरून जाणाऱ्या कॅनलमध्ये दिवसेंदिवस घाणीचा पसारा वाढत चालला आहे. कॅनलला नाल्यात रूपांतरित करणारे प्लास्टिक, कचरा, अन्नाचे अवशेष आणि थेट घरगुती सांडपाणी या सर्वांचा एकत्रित अक्राळविक्राळ मेळा पुणेकरांच्या आरोग्याला थेट धोका बनला आहे.
ह्या घाणीच्या साम्राज्यात डास, कीटक, आणि रोगजंतू मुक्तपणे नृत्य करत असून
डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा बट्ट्या उभा राहण्याची शक्यता जास्त आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे:
“स्वच्छ पुणे सुंदर पुणे म्हणणाऱ्यांनी इथे येऊन बघावं. इथून उठणारा दुर्गंध श्वास गुदमरायला लावतो. आरोग्य धोक्यात आलंय! कॅनल की कचरापेटी? प्रशासनाकडे तक्रारीचा ठिगारा.
शासन आणि मनपाचे अधिकारी इतक्या गंभीर स्थितीकडे कधी लक्ष देणार?
आता तरी स्वच्छतेचे ढोल वाजवणाऱ्या यंत्रणांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून सफाईचे बटन दाबण्याची गरज आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























