Homeताज्या बातम्यासासवड जेजुरी पोलीस हद्दीत अवैध धंद्या विरोधात आंदोलनांची घोषणा

सासवड जेजुरी पोलीस हद्दीत अवैध धंद्या विरोधात आंदोलनांची घोषणा

सासवड (प्रतिनिधी):अशोक कुंभार)

सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत, तसेच सासवड पोलीस स्टेशनने पकडलेल्या गुटख्याच्या ट्रकाची सोडवणूक कोणाच्या आदेशाने झाली याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेडतर्फे ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे.

या आंदोलनाची माहिती रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी दिली. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे पोलीस महासंचालक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

भोसले यांनी सांगितले की, “सासवड-जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मटका, जुगार, बिंगो, चक्री, गांजा, हातभट्टी असे अवैध धंदे राजरोस सुरू असून, यामागे काही अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ आहे. या सर्व धंद्यांना आळा घालण्यासाठी याआधीही अनेकवेळा निवेदने देऊन उपोषण, जागरण, टाळनाद आणि निदर्शने आंदोलन करण्यात आले.”

त्यांनी पुढे सांगितले की, “सासवड पोलीस स्टेशनने पकडलेल्या गुटख्याच्या ट्रकाची सुटका कोणाच्या आदेशाने करण्यात आली याचा तपास व्हावा. तसेच अवैध धंद्यांना पाठीशी घालणारे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांची बदली करण्यात यावी.”

हे आंदोलन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस यांच्या नेतृत्वात आणि पुणे शहर अध्यक्ष किशोर पंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

Translate »
error: Content is protected !!