(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )
सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) – सासवड शहरातील मेन रोड परिसरात कुलवंत वाणी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गाथा पारायण सोहळ्याची २५ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. हा सोहळा २५ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार असून ५ मार्च गुरुवारी तुकाराम बीजेनिमित्त सांगता होणार आहे.
या पारायण सोहळ्याचे आयोजन सोपानदेव मंदिर येथे समस्त वाणी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. दररोज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत गाथा वाचन केले जात असून पारायण कालावधीत दररोज सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत हरिपाठ व भजन कार्यक्रम होत आहेत.
तुकाराम बीजेनिमित्त ५ मार्च रोजी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे सासव
ड परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
समस्त वाणी समाजाने भाविकांना या पारायण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























