Homeताज्या बातम्यासंत सोपानकाका समाधीस साडेसात लाखांची चांदीची प्रभावळ अर्पण

संत सोपानकाका समाधीस साडेसात लाखांची चांदीची प्रभावळ अर्पण

,, (सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )

पुणे येथील भाविक श्री बाप्पू कडू यांनी संत सोपानदेव (सोपानकाका) यांच्या समाधीस सुमारे साडेसात लाख रुपयांची चांदीची प्रभावळ अर्पण केली. आपल्या आई-वडील वै. सरस्वतीबाई व वै. शिवाजीराव तुकाराम कडू तसेच सासू-सासरे स्व. गुणाबाई व स्व. बाळासाहेब कोंडे यांच्या स्मरणार्थ ही प्रभावळ अर्पण केल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली.

प्रभावळीवर कीर्तीमुख, चंद्र, सूर्य, मोर, वेलबुट्टी अशा आकर्षक आकृत्या कोरलेल्या असून वरच्या बाजूस दोन ध्वज व दोन अब्दागिरी कोरल्या आहेत. पारंपरिक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ही प्रभावळ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

महापूजा व कीर्तनसेवा

यानिमित्त सकाळी कडू परिवारातर्फे संत सोपानदेवांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांची “मन माझे लागो सोपानचरणी” या अभंगावर कीर्तनसेवा झाली. कीर्तनामध्ये महाराजांनी सोपानकाकांचे महात्म्य तसेच प्रभावळीचे आणि दानधर्माचे महत्व भावपूर्ण शब्दांत विषद केले.

यानंतर गाभाऱ्यात श्री बाप्पू कडू, सौ. सुनिता कडू, प्रतिक कडू, सौ. ऐश्वर्या मगर व गौरव मगर यांच्या हस्ते प्रभावळीची विधीवत पूजा करून ती श्रींच्या मागे स्थापित करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती व सन्मान

कार्यक्रमास देवस्थानचे विश्वस्त गोपाळकाका गोसावी, गौतम गोसावी, श्रीकांत काका गोसावी, मधुकाका गोसावी तसेच पुजारी प्रशांत पुरंदरे, चोपदार सिद्धेश शिंदे, अभय जगताप आदी उपस्थित होते. कडू परिवारातर्फे वांजळे महाराज, विश्वस्त, पुजारी, चोपदार व सेवेकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोपानदेवांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वंजारवाडीकर दिंडीचे वारकरी तसेच पसायदान वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PMC ने मेट्रो स्थानकांजवळील वाहनांसाठी 34 साइट्स अंतिम केल्या आहेत

0
पुणे : महापालिकेने मेट्रो स्थानकांजवळील ३४ जागा पार्किंगसाठी निश्चित केल्या असून चार ठिकाणचे काम सुरू झाले आहे. "पीएमसी (पुणे महानगरपालिका) आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या संयुक्त...

प्रवासी बस, ट्रक आजपासून बेमुदत संपावर

0
पुणे : ई-चलन पद्धतीचा नवा नियम सदोष असल्याचा ठपका ठेवत वाहतूकदार गुरुवारपासून शहरभरातील वाहतूक ठप्प करणार आहेत. प्रवासी बस, कार्यालयीन वाहतूक वाहने आणि ट्रक...

पश्चिम आशिया संघर्ष: 111 पुणे रहिवासींपैकी 80 इंदिरा विद्यापीठाचे विद्यार्थी UAE मधून परत आले

0
दुबईहून परतलेल्या 111 पुणे रहिवाशांपैकी 80 विद्यार्थी (उमा कदम/TOI) पुणे: अमेरिका-इस्रायल-इराण लष्करी संघर्षामुळे दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांसह पुणे जिल्ह्यातील एकूण 111 रहिवासी...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे विस्तारीकरण प्रस्तावाचे तृतीय पक्ष पुनरावलोकन

0
पुणे: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेचे रुंदीकरण 10 लेन सुपरहायवे करण्यासाठी 16,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यापूर्वी तृतीय पक्षाकडून मूल्यांकन सुरू...

पुण्यात होळीचा कडकडाट: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ६७६ वाहनचालकांवर गुन्हा दाखल, २५० हून अधिक...

0
होळी साजरी करताना पुण्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर मोठी कारवाई झाली (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे - होळीच्या मुहूर्तावर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या पुणे आणि...

Translate »
error: Content is protected !!