Homeताज्या बातम्याविश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६ क्रिकेट स्पर्धेची दिमाखात सुरुवात

विश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६ क्रिकेट स्पर्धेची दिमाखात सुरुवात

लोणी काळभोर (प्रतिनिधी रविदास कदम)
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (VSM–2026) या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन व आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांना सोमवारी दिमाखात सुरुवात झाली. एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात तसेच निकम क्रिकेट अकादमीच्या मैदानावर एकाच वेळी दोन रोमांचक सामने खेळविण्यात आले.
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान एमआयटी एडीटी एसओसी, लोणी काळभोर संघाने एमआयटी एसीएससी, आळंदी संघावर ३१ धावांनी मात करत विजयी सलामी दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एमआयटी एसओसी संघाने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले. संघाचा फलंदाज सुमित हिंगे याने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या खेळीच्या जोरावर एमआयटी एसओसी संघाने निर्धारित १६ षटकांत ४ गडी गमावून १६१ धावांचा डोंगर उभारला.
प्रत्युत्तरात एमआयटी एसीएससी संघाला शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर संघर्ष करावा लागला. हर्ष पांडे याने २८ चेंडूंमध्ये ४६ धावांची झुंजार खेळी केली; मात्र संघाला १६ षटकांत ७ गडी गमावून केवळ १३० धावाच करता आल्या. एमआयटी एसओसीकडून पूर्वविजय सोनी याने उत्कृष्ट गोलंदाजी करत १८ धावांत ४ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. या सामन्यात सुमित हिंगे याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दरम्यान, निकम क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात मॉडर्न लॉ कॉलेज संघाने एमआयटी एओई संघावर एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना एमआयटी एओई संघ १४ षटकांत ९७ धावांवर सर्वबाद झाला. मॉडर्न लॉ कॉलेजकडून संग्राम शेवाळे याने २६ धावांत ३ बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मॉडर्न लॉ कॉलेजच्या सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ८ षटकांत एकही गडी न गमावता विजय मिळवला. वेदांत भडमुखे याने २७ चेंडूंमध्ये नाबाद ५३ धावा केल्या, तर आर्यन जाधव याने २१ चेंडूंमध्ये नाबाद ४२ धावा करत संघाला सहज विजय मिळवून दिला. या सामन्यात आर्यन जाधव याला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
विश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६ अंतर्गत पुढील काही दिवस विविध महाविद्यालयांतील संघांमध्ये चुरशीचे क्रिकेट सामने खेळविले जाणार असून, क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!