📝 बातमी : अशोक कुंभार प्रतिनिधी
प्राध्यापक तथा कवी शरदचंद्र काकडेदेशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील सुखसागर येथे भव्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्यसंमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या नामवंत कवी आणि काव्यरसिकांनी आपल्या बहारदार आणि विचारप्रवर्तक काव्यरचना सादर करून रसिकांची मने जिंकली.
या काव्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून वैचारिक लेखनासाठी ओळखले जाणारे लेखक व कवी विलास बाबर यांनी शोभा वाढवली. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक भाऊसाहेब परदेशी सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राजयुवा संघटनेचे प्रमुख गौरव पुंडे आणि योगेश हरणे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालन अभियंता रविंद्र काकडे यांनी केले.
काव्यसंमेलनामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कवी शरदचंद्र काकडेदेशमुख यांच्या साहित्यिक योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























