Homeताज्या बातम्यापुरंदर तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; 19 जानेवारीपासून उपोषण आर्थिक तडजोडीचा...

पुरंदर तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; 19 जानेवारीपासून उपोषण आर्थिक तडजोडीचा आरोप

पुरंदर (पुणे) अशोक कुंभार:
पुरंदर तालुक्यातील मौजे आंबोली येथील अनुसूचित जाती प वर्गातील महार वतन शेतकऱ्यांवर अन्याय करत आर्थिक तडजोडीतून रस्ता मंजूर केल्याचा गंभीर आरोप पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत व सासवडचे मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अन्यायकारक आदेश तात्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 पासून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
मौजे आंबोली, तालुका पुरंदर येथील गट क्रमांक 136, 132, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145 व 146 या महार वतन (इनाम वर्ग 6, वर्ग 2) जमिनीमधून जबरदस्तीने रस्ता काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन कावी क्रमांक 261/2024 अंतर्गत महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये रस्ता मागणीचा अर्ज दाखल करण्यात आला होता.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, सदर अर्जातील काही मूळ अर्जदारांनी प्रत्यक्ष अर्जावर स्वाक्षरी केलेली नाही, तसेच न्यायालयीन कामकाजात हजर राहिल्याचे कोणतेही पुरावे सादर झालेले नाहीत. काही अर्जदारांचे परस्पर नाते स्पष्ट नसतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब नोंदवलेले नाहीत. मूळ अर्जदार नसतानाही अन्वर बाबुलाल शेख यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी अर्जाचा गैरवापर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, संबंधित ठिकाणी आधीपासूनच सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता अस्तित्वात असताना केवळ गरीब अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने व महार वतन जमिनी पळकावण्यासाठी हा प्रकार केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उच्चदाब विद्युत वाहिनीखाली बेकायदेशीर बांधकाम तसेच महार वतन जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले.
तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता, त्यांचे जबाब नोंदवले नाहीत, वकीलपत्र सादर करण्याची संधी दिली नाही, तसेच केवळ मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालावर अवलंबून राहून निर्णय दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून आम्हाला मान्य नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!