Homeताज्या बातम्याज्येष्ठ पर्यावरणतज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस अर्पण एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन...

ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस अर्पण एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६; २३ ते २७ जानेवारी दरम्यान आयोजन

पुणे प्रतिनिधी (अशोक कुंभार)
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एम्प्रेस गार्डन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे पुष्पप्रदर्शन ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता एम्प्रेस गार्डन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत सुरेश पिंगळे (उपाध्यक्ष, प्रदर्शन समिती) आणि सुमन किर्लोस्कर (अध्यक्ष, प्रदर्शन समिती) यांनी माहिती दिली.
डॉ. माधव गाडगीळ हे ॲग्रीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेचे मानद सदस्य होते. त्यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रात भरून न निघणारी हानी झाली असून, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे
यंदाच्या पुष्पप्रदर्शनात
कलात्मक पुष्परचना
जपानी पद्धतीच्या इकेबाना (Ikebana) पुष्परचना
विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष
ही मुख्य आकर्षणे असणार आहेत. तसेच एम्प्रेस गार्डन संपूर्णपणे विविध रंगीबेरंगी फुले व पानांनी सजवण्यात येणार असून, निसर्गप्रेमी व पुष्परसिकांना नेत्रसुखद अनुभव घेता येणार आहे.
राज्यस्तरीय सहभाग
या प्रदर्शनात पुणे शहरासह कोल्हापूर, सांगली, नाशिक तसेच इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिक सहभागी होणार आहेत.
विविध स्पर्धांचे आयोजन
पुष्पप्रेमींसाठी
फुलांची मांडणी
फळ व भाजीपाला
आकर्षक कुंड्यांची सजावट
अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धांमध्ये विविध शाळांतील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
संस्थेचा उद्देश
१८३० पासून कार्यरत असलेली ॲग्रीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन पाहते. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, जनमानसात निसर्गप्रेम व पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण करणे हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे.
प्रदर्शनाची वेळ
शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ : दुपारी १ ते संध्याकाळी ७
शनिवार ते मंगळवार, २४ ते २७ जानेवारी २०२६ : सकाळी ९ ते संध्याकाळी ७
सर्व निसर्ग व पुष्पप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पुष्पप्रदर्शनाचा आनंद घ्यावा तसेच डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!