—
“ओळख ज्ञानेश्वरी” उपक्रम नाशिकमध्ये उत्साहात – 105 शाळांमध्ये यशस्वी अंमलबजावणी
नाशिक | 5 ऑगस्ट 2025 – संत साहित्य आणि ज्ञानेश्वरीची गोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी “ओळख ज्ञानेश्वरी” उपक्रम नाशिक शहरातील पाच शाळांमध्ये राबविण्यात आला. संत साहित्य, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीचे पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करून उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन “ओळख ज्ञानेश्वरी” परिवाराचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी संचालक अजित वडगावकर![]()
, माजी मुख्याध्यापक गजानन अंभोरे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. या उपक्रमात आदर्श विद्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, जनता विद्यालय, मराठा विद्यालय या शाळांचा समावेश होता. शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात ह.भ.प. गेठे महाराज वासुदेव महाराज, शेवाळे (नाशिकचे माजी मुख्याध्यापक), पत्रकार अर्जुन मेदनकर, भानुदास पराड, दादाभाऊ करांडे, विठ्ठल महाराज शिंदे, रोहिदास कदम, माऊली घुडरे शंकर कुर्हाडे, आणि इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.
—
🗣️ ह.भ.प. गेठे महाराज यांचा संत संदेश: “ज्ञानेश्वरी हीच जीवनातील मार्गदर्शक मेन्युअल”
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ह.भ.प. गेठे महाराज म्हणाले:
> “जसं आपण मोबाईल, टीव्ही किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो, तेव्हा त्यासोबत एक मेन्युअल (मार्गदर्शक) मिळतो – ज्याच्या आधारे आपण त्या वस्तूचा योग्य वापर शिकतो.
त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात ‘ज्ञानेश्वरी’ हेच एक श्रेष्ठ मेन्युअल आहे. यातून शिकता येतं की –
📘 कसं बोलावं,
📘 कसं वागावं,
📘 गुरू, शिक्षक, पालक यांचा आदर कसा करावा,
📘 जीवन सन्मार्गावर कसं चालावं.
इतर पुस्तकं माहिती देतात, पण ‘ज्ञानेश्वरी’ माणूस घडवतं.”
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या विचारांना भरभरून दाद दिली.
—
“ज्ञानेश्वरी परिवार” व पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आजपर्यंत 105 शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. मुक्ताईनगर, आळंदी, सासवड आणि आता नाशिक येथेही या उपक्रमाचा विस्तार होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























