बालेवाडी (रवी कदम): सामाजिक, शैक्षणिक आणि वारकरी परंपरेशी निगडित असलेल्या कार्यातून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे तथा ग्रामस्थांच्या मनात प्रेमाने स्थान मिळवणारे कै. दशरथ कोंडीबा बालवडकर (पाटील) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी, सर्वे नं. ४४/६, संघर्ष चौक, वन व्ह्यू शेजारी, मंत्रा मेजेस्टिकसमोर, बालवडी येथे पार पडणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सचिन दादा पवार यांचे हरिकीर्तन संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणार असून, ग्रामस्थ, नातेवाईक व आप्तेष्टांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. प्रकाश दशरथ बालवडकर (सदस्य, महाराष्ट्र राज्य परिषद भा.ज.पा.),
श्री. विलास दशरथ बालवडकर (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, पुणे),
श्री. कालिदास दशरथ बालवडकर,
सौ. कल्पना भरत कुऱ्हाडे
सौ. सुषमा दत्तात्रय राक्षे तसेच समस्त बालवडकर परिवार व आप्तेष्ट नातवईक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
💐 “कठीण केली आयुष्याची सुरुवात, सगळ्यांवर फिरवला मायेचा हात…
सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ; जन्मोजन्मी पाहू आहो तुझीच वाट…” 💐
🕉️ वारकरी सेवेत बालवडकर परिवाराचे अमूल्य योगदान
बालवडकर परिवार हा वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलेला परिवार आहे. संत परंपरेशी नाळ जुळवून त्यांनी अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांना आर्थिक तसेच वैयक्तिक पाठबळ दिले आहे.
माऊली मंदिरात झालेल्या कळसार्पण सोहळ्यात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून भक्तांच्या हृदयात भावनिक क्षण निर्माण केला. त्याचबरोबर माऊली संस्थान, आळंदी येथील गोशाळेसाठी अकरा लाखांचा टेम्पो अर्पण करून गोसेवेला चालना दिली.
याचबरोबर तुकाराम महाराज भंडारा डोंगर येथील तुकाराम महाराज संस्थेला तब्बल ५० लाख रुपयांचे अनुदान देऊन वारकरी सेवेला मोठे आर्थिक योगदान दिले आहे.
सध्या बालेवाडी येथे वारकरी भवन उभारण्याचे काम सुरू असून हे भवन सर्व पक्षांच्या कार्यालयांप्रमाणेच आलिशान आणि सुसज्ज असेल. या भवनात बाहेरून येणाऱ्या वारकरी महाराजांसाठी राहण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि आवश्यक सोयींची व्यवस्था केली जाणार आहे.
🙏 “सेवा हीच साधना, भक्ती हीच शक्ती — बालवडकर परिवाराची ओळख भक्तीमय कार्यातूनच उमटते.” 🙏
🌿 प्रेरणादायी विचार — “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी”
“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी — म्हणजे बीज शुद्ध असेल, तर फळही शुद्धच मिळते.
वडिलांनी पेरलेले संस्काराचे दाणे आज लाखो पटीने उगवून आले आहेत.
पाय असावेत जमिनीवर, अंबर गाठताना ओठावर हास्य असावे…
कारण जे काळीज काढून देतात, तेच खरे आयुष्याचे धन असते.”
ही ओळ केवळ विचार नाही, तर कै. दशरथ कोंडीबा बालवडकर (पाटील) यांच्या जीवनाचे सार आहे. त्यांनी पेरलेले संस्कार, समाजसेवेची वृत्ती आणि वारकरी संप्रदायाप्रती असलेला निष्ठावान भाव आज बालवडकर परिवाराच्या प्रत्येक कार्यात प्रतिबिंबित होतो.
💫 “संस्कारांच्या बीजातूनच समाजाचे फळ फुलते — हेच खरे जीवनाचे पुण्य.” 💫
📢 समारोप : श्रद्धांजलीचा सोहळा प्रेरणेचा संदेश देणारा ठरेल
कै. दशरथ कोंडीबा बालवडकर (पाटील) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रम हा केवळ श्रद्धांजली नव्हे, तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा एक प्रयत्न आहे. समाजकार्य, वारकरी सेवा आणि भक्तीभाव यांचा संगम असलेले त्यांचे आयुष्य आज नव्या पिढीसाठी आदर्श ठरत आहे.
सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, भक्तजन आणि वारकरी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करावे, असे आवाहन समस्त बालवडकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























