(प्रतिनिधी अशोक कुंभार) कात्रज (पुणे) : इसवी सन २०२६ साठीचा मानाचा समजला जाणारा तितिक्षा ग्रंथ पुरस्कार जेष्ठ साहित्यिक व निवृत्त प्राध्यापक प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख यांना जाहीर झाला आहे. कात्रज येथील शाहू मंदिर महाविद्यालयाशी निगडित असलेल्या प्रा. काकडेदेशमुख यांच्या साहित्यसेवेचा हा सन्मान मानला जात आहे.
त्यांनी आजवर चार काव्यसंग्रह प्रकाशित केले असून, शेतकऱ्यांच्या खडतर आणि वेदनादायी जीवनावर आधारित असलेल्या “फाशी” या काव्यसंग्रहाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. या काव्यसंग्रहातून ग्रामीण वास्तव, संघर्ष आणि भावनिक बाजू प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
या गौरवाच्या निमित्ताने साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रा. काकडेदेशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दरम्यान, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापिका प्रिया दामले या देखील यावेळी उपस्थित होते

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























