Homeताज्या बातम्याआषाढी वारीच्या तयारीला वेग; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची आळंदीत नियोजन बैठक

आषाढी वारीच्या तयारीला वेग; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची आळंदीत नियोजन बैठक

आळंदी | प्रतिनिधी सचिन शिंदे
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आळंदीतील तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसराला भेट देत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण नियोजन बैठक घेतली.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविक आळंदीत दाखल होत असल्याने त्यांच्या सोयी-सुविधा, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेबाबत सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. वारी निर्विघ्न, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी आळंदी नगरपरिषद व आळंदी ग्रामस्थांच्या वतीने विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, सभागृह नेते सचिन गिलबिले, आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारीमुळे यंदाची वारी अधिक सुकर, सुरक्षित आणि भाविकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घोषणेनंतर चार वर्षांनी, रांजणगाव येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमध्ये पायाभूत कामांना वेग आला

0
297 एकरांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात एकूण 492 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यामध्ये MIDC 285 कोटी आणि केंद्राचा 208 कोटी रुपयांचा वाटा आहे. पुणे...

आयटी फर्मच्या हिंजवडी शाखेने प्रोजेक्टशिवाय अनेक फ्रेशर्सना कामावर घेतले, सरकारच्या आयटी कॉन्ट्रॅक्टवर डोळा: हिंजवडी...

0
सीईओला मंगळवारी त्यांच्या नाशिकमधील आडगाव येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि रात्री त्यांना पुण्यात आणण्यात आले, त्यानंतर बुधवारी फसवणूक प्रकरणात त्यांना औपचारिक अटक...

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

0
पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

0
एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली 52 हजार लिटर अवैध दारू जप्त, नष्ट

0
भारतीय पोलिसांनी अंमलबजावणी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अवैध दारूच्या बाटल्या नष्ट केल्या पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी २८ मे ते २ जून दरम्यान...

Translate »
error: Content is protected !!