Homeताज्या बातम्याआळंदी संताप बापू भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तृत्व विरोधात निषेधार्थ आंदोलन

आळंदी संताप बापू भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तृत्व विरोधात निषेधार्थ आंदोलन

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे झालेल्या एका कीर्तन कार्यक्रमात कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा राजकीय वादळ उठले आहे. “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” असे भडक विधान भंडारे यांनी केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने आळंदीत संतापाची लाट उसळली.

या वक्तव्याच्या निषेधार्थ आज २२ ऑगस्ट रोजी आळंदीत नागरिक, वारकरी बांधव व माऊली मंदिर भक्तांनी महाद्वार चौकात निषेध नोंदवत भंडारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आळंदी पोलिस स्टेशनमध्ये ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देखील देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे नेते उत्तम गोगावले यांनी ठाम इशारा देत म्हटले की, “पुढील काळात कोणत्याही महाराजांनी आपल्या आडनावासमोर ‘आळंदीकर’ लिहायचे नाही,” असा खणखणीत इशारा देत त्यांनी भंडारे यांच्या वक्तृत्वाचा निषेध केला.

निषेध सभेला माजी विरोधी पक्षनेते डीडी भोसले पाटील, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर्स सेलचे उपाध्यक्ष डॉ. मनोज रांका, शिवसेना माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, एस.पी. गट काँग्रेसचे संदीप नाईकरे पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, सतीश सागर, रानवडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश आरू, संजू वडगावकर, माऊली घुंडरे, प्रसाद बोराटे, महेश कुऱ्हाडे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, समाज प्रबोधनासाठी प्रवचन व कीर्तन झाले पाहिजे; पण गोडसेच्या नावाने समाजात विष पेरले गेले, तर आळंदीकरी व वारकरी भक्त कधीही ते सहन करणार नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी दिवे घाटमार्गे दुहेरी बोगदे करण्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष, व्यवहार्यता अभ्यासाची मागणी...

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री...

युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे ८२ व्या वर्षी निधन पुणे बातम्या

0
पुणे : समाजवादी विचारवंत, माजी आमदार आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी शहरात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.महाराष्ट्र...

53km एलिव्हेटेड कॉरिडॉर चाकणच्या रहदारीच्या दुःस्वप्नाला आशा देतो | पुणे बातम्या

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी केली....

सुनेत्रा यांना पत्र लिहून पार्थची कारकीर्द संपुष्टात आणण्याच्या पक्षाच्या काही सदस्यांच्या प्रयत्नाकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश...

0
राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य पार्थ पवार पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपप्रमुख उदयकुमार आहेर यांनी पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून, त्यांचा मोठा मुलगा, राज्यसभा...

शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!” – सासवडमध्ये उभाठा गटाचे अभिजीत जगताप यांचे आमरण उपोषण

0
सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) प्रतिनिधी अशोक कुंभार दि. 17 जुलै 2026 : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणारी परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या...

Translate »
error: Content is protected !!