आळंदी, प्रतिनिधी (रोहिदास कदम): आळंदी-चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. ज्योत्स्ना आवारे, उपाध्यक्षपदी डॉ. निखिल सोनावणे, सचिवपदी डॉ. सचिन सुढे, सहसचिवपदी डॉ. अशोक रहाणे, खजिनदारपदी डॉ. रविंद्र ददरुखे तर सहखजिनदारपदी डॉ. अमोल देवकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. प्रतिमा ठाकूर, डॉ. देवेंद्र राजूत, डॉ. स्वप्नील घुमाळ, डॉ. स्वाती द्रविडे, डॉ. प्रविण देशमुख, डॉ. अजित कानडे, डॉ. मनीषा रेंचे, डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमित कवर, डॉ. जगदीश पायघडे आणि डॉ. सुरेश कुमकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी अध्यक्ष डॉ. विकास खेबडे पाटील, माजी सचिव डॉ. अंबालाल पाटील आणि माजी खजिनदार डॉ. नितीनकुमार जाधव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे आळंदी-चऱ्होली परिसरातील वैद्यकीय सेवांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून वैद्यकीय क्षेत्रासह विविध स्तरांतून नवनिर्वाचित कार्यकारिणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आळंदी-चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. ज्योत्स्ना आवारे”

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























