- ‘
📍 ठिकाण: आळंदी (प्रतिनिधी – रवि कदम)श्री संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचा मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पावनखिंड फेम अभिनेते अजय पुरकर, दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर, अभिनेत्री स्मिता शेवाळे, अभिनेते योगेश सोमगायक अवधूत गांधी तसेच इतर मान्यवर कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























