वार्ताहर सचिन शिंदे मानव मित्र
पुणे, दि. १७ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित २९ व्या पालखी पादुका दर्शन सोहळ्याचा शुभारंभ आज पुण्यात ‘वासा पूजनाने’ भक्तीमय वातावरणात करण्यात आला.
पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात पार पडलेल्या या सोहळ्यात माजी नगरसेवक सुनील पांडे आणि स्वामी भक्त अभिजीत मोडक यांच्या हस्ते वासा पूजन करण्यात आले. यावेळी पराग कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी आणि योगेश शेठ फाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
२९ वर्षांपासून सुरू असलेला हा पालखी सोहळा स्वामी भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. वासा पूजनानंतर आता पालखी सोहळा आणि पादुका दर्शनाची तयारी सुरू झाली आहे.
संयोजन समितीच्या वतीने पुणेकर स्वामी भक्तांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























