Homeताज्या बातम्यामेट्रो मार्गाचा शिक्कामोर्तब करण्याचा करण्याच्या दृष्टीने मुंबईत बैठक

मेट्रो मार्गाचा शिक्कामोर्तब करण्याचा करण्याच्या दृष्टीने मुंबईत बैठक

चाकण, पुणे : आयटी पार्क हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याचं मार्गाची आणि त्यावरील प्रस्तावित स्टेशनची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. या मेट्रो मार्गिकेवर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवडमधील भक्ती शक्ती चौकातून या मार्गाची सुरुवात होणार आहे. तिथून मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स कंपनी, तळवडे एमआयडीसी, चाकण एमआयडीसी मार्गे चाकण शहरापर्यंत पोहचेल. जवळपास 41 ते 42 किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग असेल. यात काही बदल अपेक्षित आहेत. त्याचं अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन, या विस्तारित मेट्रोवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याचा विडा अजित पवारांनी उचलला आहे. त्यासाठी अजित पवारांनी प्रत्यक्ष पाहणी दौरे ही केलेत. याचाच भाग म्हणून हा विस्तारित मेट्रो मार्ग सत्यात उतरवला जाणार आहे. हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी आणि तळवडे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे.

अजित पवारांनी दिली बैठकीची सोशल मिडीयावर माहिती (Ajit Pawar X Post)

आज पुण्यातील मेट्रो कार्यालयात रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडी मेट्रो मार्ग एमएसआयडीसी एलिव्हेटेड रोडशी ओव्हरलॅप होत असल्याच्या विषयाबाबत व शहरातील मेट्रो लाइन विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मेट्रो लाईन विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी ओव्हरलॅपसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारित सूचना केल्या.

नव्या मेट्रो मार्गामुळे रोजची वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. औद्योगिक तसेच व्यापारी क्षेत्रांमध्ये येणाऱ्या प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचून आर्थिक कार्यक्षमतेतही वाढ होईल. महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

मेट्रो मार्गामुळे फक्त वाहनांची कोंडी कमी होणार नाही, तर पर्यावरणालाही दिलासा मिळेल. रस्त्यांवरील अतिरिक्त वाहतूक कमी झाल्याने प्रदूषणात घट होईल. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील नागरिकांसाठी मोठा बदल घडवून आणणार आहे. मात्र, प्रकल्पाची नेमकी सुरुवात आणि पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी या मेट्रो प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असेही आवाहन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घुले हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; तपासाला पूर्ण सहकार्य करू – खा. बजरंग बप्पा...

0
पुणे जिल्हा मानव मित्र न्यूज | प्रतिनिधी : रोहीदास कदम केज (बीड) : बीड जिल्ह्यातील टाकळी (ता. केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येच्या घटनेने...

घनसावंगीत शेतकऱ्याला मोठा फटका! शिवणगाव शिवारातून ७.५ एचपीची मोटार चोरी

0
घनसावंगी तिर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव शिवारात एका शेतकऱ्याची ७.५ एचपीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. आधीच...

कोण होता केतन अग्रवाल? सक्सेस ग्रुप डायरेक्टर आणि वर-वधू यांची लोहगड ट्रिप शोकांतिकेत संपली

0
पुण्यातील २६ वर्षीय उद्योजकाचा लोहगड येथे दुर्दैवी मृत्यू झाला पुणे: अलीकडच्या काही दिवसांत समोर आलेल्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये केतन विशाल अग्रवाल वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये...

पुण्यातील लोहगड किल्ला हत्या: केतन अग्रवालचे वडील म्हणतात की त्यांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला,...

0
'तिला लग्न करायचं नसतं तर ती नकार देऊ शकली असती': केतन अग्रवालचे वडील पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालला त्याची मंगेतर सिया गोयल आणि...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

0
पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

Translate »
error: Content is protected !!