पुणे जिल्हा मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहीदास कदम, आळंदी देवाची
आळंदी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दिघी-आळंदी वाहतूक शाखेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार सुरेखा राजेश गायकवाड (बक्कल क्रमांक ७३४) यांची २४ जून २०२६ रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती झाली आहे.
प्रामाणिक सेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि वाहतूक व्यवस्थापनातील उल्लेखनीय योगदानाच्या बळावर त्यांनी ही पदोन्नती मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण दिघी-आळंदी वाहतूक शाखेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अधिकारी व सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिघी-आळंदी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सुरेखा गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पीएसआय चव्हाण यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
पोलीस दलात महिलांचे योगदान दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत असून, सुरेखा गायकवाड यांची ही पदोन्नती अनेक महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना यांना नेहमीच यशाची साथ मिळते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
मानव मित्र न्यूज लाईव्ह परिवाराकडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेखा राजेश गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सेवाप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























