( बातमी |प्रतिनिधी राहुल बोबडे )
जालना जिल्ह्यात भीषण अपघात, मदतीला उशीर?
जालना जिल्ह्यातील अंबड परिसरातील मार्डीय फाटा, रोवलागड रोडवर दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर सुमारे एक तास पोलिस घटनास्थळी दाखल झाले नाहीत, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने मदतकार्यालाही विलंब झाल्याची चर्चा आहे.
नंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मार्डीय फाटा – रोवलागड रोड हा अपघातप्रवण भाग असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























