आळंदी (प्रतिनिधी माऊली घुंडरे )— आगामी नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच आळंदी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात गाठीभेटी, शुभेच्छा देणे, फराळ वाटप आणि प्रचाराची प्रारंभिक तयारी सुरू केली आहे.
यावेळी आळंदी नगरपरिषदेमध्ये एकूण १० प्रभाग तयार झाले असून, ११ महिला व १० पुरुष उमेदवार इच्छुक असल्याची चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वाधिक मतदारसंख्या असल्याने या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे या प्रमुख पक्षांसोबतच काही अपक्ष उमेदवारही आपली ताकद आजमावणार आहेत. सोशल मीडियासह प्रत्यक्ष भेटीगाठींमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याची चुरस उमेदवारांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी आळंदी विकास तिसरी आघाडी सुद्धा आखाड्यात उतरणार आहे.राजकीय चर्चा, बैठका आणि स्नेहभोजनांचे आयोजनही होत असून, दिवाळीनंतर या चर्चेला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























