Homeताज्या बातम्यात्रिवेणी संतांचा पुण्यस्मरण सोहळा आळंदीतील ज्ञानेश्वर मंदिरात साजरा

त्रिवेणी संतांचा पुण्यस्मरण सोहळा आळंदीतील ज्ञानेश्वर मंदिरात साजरा

आळंदी, दि. १७ (वार्ताहर.सचिन शिंदे)
सर्व संतांच्या पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्रित साजऱ्या करण्याच्या संकल्पनेतून श्री संत सोपानकाका महाराज यांचा समाधी सोहळा आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात भक्तिभावात पार पडला. यावेळी श्री संत जगनाडे महाराज व श्री संत कान्होराज महाराज यांच्या त्रिवेणी संगमाचा समाधी सोहळा व पुण्यतिथी कार्यक्रमही साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तिन्ही संतांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. गजानन महाराज शास्त्री यांचे सुमधुर कीर्तन झाले. कीर्तनाला श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथील विद्यार्थ्यांनी साथसंगत केली. ही संस्था वर्षभर श्री ज्ञानोबारायांच्या मंदिरातील विविध सेवांमध्ये सक्रिय असते.
ह.भ.प. गजानन महाराज शास्त्री यांनी आपल्या कीर्तनातून श्री संत सोपानकाका महाराज, श्री संत कान्होराज महाराज व श्री संत जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्याचा प्रभावी आढावा घेत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. परभणी जिल्ह्यातून खास ज्ञानोबारायांच्या सेवेसाठी उपस्थित राहून त्यांनी आपली सेवा पूर्ण केली.
या कार्यक्रमास कै. ह.भ.प. बाळकृष्ण महाराज दिंडी, श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, वारकरी सेवा संघ यांचे पदाधिकारी तसेच मोहन महाराज शिंदे, रामचंद्र महाराज सारंग, रवींद्र महाराज कुमकर यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड किल्ल्यावर दरीत पडून रिअल इस्टेट फर्मच्या संचालकाचा मृत्यू; पुढील महिन्यात त्याचे लग्न होणार...

0
पुणे : पिंपरी चिंचवडमधील एका प्रख्यात रिअल इस्टेट फर्मच्या २५ वर्षीय संचालकाचा गुरुवारी सकाळी शहरापासून ५२ किमी अंतरावर असलेल्या लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर...

3 अटक, पुणे ग्रामीण पोलिसांनी 20 गुन्हे उघडकीस आणले

0
पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोड्या, दरोडे आणि दरोड्याचे 20 गुन्हे उघडकीस आणून अटक केली, तर आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मोटारसायकल असा २५ लाखांचा...

सेना (UBT) दोन खासदारांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे

0
सेनेचे (UBT) आमदार अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांना उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क...

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायट्या, मतदान अधिकारी बांधील

0
पुणे : बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ला रहिवाशांपर्यंत पोहोचण्यास आणि या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) मध्ये...

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

0
पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

Translate »
error: Content is protected !!