🗳️ सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) — येत्या सासवड नगरपालिका निवडणुकीत प्रभांग क्रमांक ८ मधून आरीफ गुलाब आतार यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत आहेत.
आरीफ आतार यांनी सांगितले की, “आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत मी सासवड शहराच्या विकासासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. पक्षाने संधी दिल्यास मी नागरिकांची सेवा करण्यास सदैव तयार आहे.”

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























