📰 बातमी प्रतिनिधी/माऊली घुंडरे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत राबवली जाणार आहे.
31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, 2 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर 3 जानेवारी रोजी चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















