स्थळ संगमेश्वर मंदिर कराह नदी काठी सासवड दिनांक व वेळ 5 नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता
सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
त्रिपुरी पौर्णिमेच्या पावन शुभ मुहूर्तावर, सासवड येथील संगमेश्वर मंदिर परिसरातील कऱ्हा नदी घाटावर भव्य “कऱ्हा माई महाआरती” (गंगा आरती) सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
या दिव्य आरतीसोहळ्यात वाराणसी येथील प्रसिद्ध महंत पुजारी विशेष मंत्रोच्चारांसह गंगा पूजन व महाआरती विधी पार पाडणार आहेत. या प्रसंगी परिसरात दीपोत्सव, हरिनाम संकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन
🙏 सौ. ज्योतीताई संजय टिळेकर व
🙏 श्री. मनोजदादा म्हेत्रे
यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख उपस्थिती:
⭐ राजेशजी पांडे – महामंत्री, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य
⭐ धीरजजी घाटे – अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पुणे शहर
⭐ श्रीमती रंजना (नानी) पुंडलिक टिळेकर – प्रथम नगरसेविका, पुणे महानगरपालिका
⭐ योगेश पुंडलिक टिळेकर – आमदार, विधान परिषद
⭐ संध्याताई टिळेकर – संस्थापक अध्यक्ष, स्त्रीशक्ती फाउंडेशन
⭐ संजयजी जगताप – माजी आमदार, पुरंदर-हवेली मतदारसंघ
⭐ राजवर्धिनी जगताप – ग्रामीण संस्था अध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था
आयोजकांनी सर्व भाविक, नागरिक व महिला मंडळांना या आध्यात्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























