पुणे प्रतिनिधी (
जगदीश सोनवणे) टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. हिरा भोजराज आधंताया (वय 83) यांचे बुधवारी सकाळी आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पार्थिवावर गोळीबार मैदानयेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ हारा आधंताया यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून ठीक नव्हती. उपचारासाठी काही काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना घरी हलविण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. हिरा आधंताया यांनी १९९६ ते २००५ या कालावधीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने दूरशिक्षण विभाग सुरू केला. तसेच महिला विद्यार्थिनींचा विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढला. त्या टिळक विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या होत्या.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी जुलै २००५ मध्ये सेवामुक्ती स्वीकारली होती. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
“त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक ज्ञानवंत हरपला आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असे कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी म्हटले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























