📰 काळूस नगरीतील यशस्वी उद्योजक गणेश.नाना आरगडे यांचे रायगडावर भव्य शक्तीप्रदर्शन
काळूस (प्रतिनिधी : कु. राहुल आनंदराव खैरे) :
काळूस मेदनकरवाडी गटातील जिल्हा परिषद उमेदवार व पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध फायनल सम्राट तसेच माईलस्टोन बिल्डकाॅन चे सर्वेसर्वा सन्माननीय श्री. मा. गणेशनाना सर्जेराव आरगडे यांनी रायगडावर भव्य शक्तीप्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
खचलेल्या मनांना उभारी देणारे, निराश हातांना सामर्थ्य देणारे, “स्वर्ग ज्याला म्हणतात तोच हा दुर्गराज रायगड” या भावनेने गणेश.नाना आरगडे यांनी तब्बल 2000 हून अधिक मावळे आणि शिलेदारांसह रायगडावर उपस्थित राहून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
या कार्यक्रमादरम्यान उत्साह, जयघोष आणि एकता यांचा अविष्कार झाला. स्थानिकांसह रायगड परिसरात या भव्य उपस्थितीची जोरदार चर्चा होत असून, गणेश. नाना आरगडे यांचे हे नेतृत्व आणि संघटन कौशल्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























