जागतिक डास दिनी खेड तालुक्यात आरोग्य प्रबोधन
आळंदी ( रवी कदम ) : ब्रिटिश डॉ. रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये डास_.gallery-edit-1-300×181.jpg” alt=”” width=”300″ height=”181″ class=”alignnone size-medium wp-image-5868″ /> मुळे मलेरिया पसरतो हे महत्त्वाचे निरीक्षण नोंद केले. या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आयुष्मान आरोग्य मंदिर राजगुरुनगर सह खेड तालुक्यात विविध आरोग्य सेवा कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
जागतिक डास दिन खेड तालुक्यात वैद्यकीय अधिकारी डाॅ अशोक मैंदाड व डाॅ इंदिरा पारखे, तालुका आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी आरोग्य सहायक भूषण भारती, महेश दहिवळ, दिपक शेलार यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत डास व त्या पासुन होणारे आजार याबद्दल जनजागृती केली. आरोग्य सेवक चंद्रशेखर जाधव, प्रतिक गवारी, चंद्रकांत पंचरास, रोहन कोळपकर, दिपक भुसारी, अल्पेश महाकाळ यांनी राजगुरुनगर बसस्थानक आणि हुतात्मा राजगुरु विद्यालय राजगुरुनगर बस स्थानक मध्ये प्रवासी, शिक्षक, विद्यार्थ्यांना डास व आजार प्रतिबंध आणि उपचार यांची माहिती देत संवाद साधला. अधिक समता पूर्ण जगासाठी मलेरिया विरुद्धच्या लढाईला गती देणे यासाठी जागतिक डास दिन २०२५ ची थीम घेवुन जागतिक डास दिन आरोग्य विषयक जनजागृतीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. डासांपासुन होणा-या रोगांसाठी प्रतिबंध, निदान व उपचार यांवर या निमित्त भर देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























