Homeताज्या बातम्याघुले हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; तपासाला पूर्ण सहकार्य करू – खा....

घुले हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; तपासाला पूर्ण सहकार्य करू – खा. बजरंग बप्पा सोनवणे

पुणे जिल्हा मानव मित्र न्यूज | प्रतिनिधी : रोहीदास कदम
केज (बीड) : बीड जिल्ह्यातील टाकळी (ता. केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार सोनवणे म्हणाले की, “या हत्येशी आमचा दूरवरचाही संबंध नाही. सत्य जनतेसमोर यावे यासाठी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. आवश्यक असल्यास माझे आणि माझ्या मुलाचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) देखील तपासावेत. आम्ही तपासात संपूर्ण सहकार्य करू.”
यावेळी त्यांनी आपल्या मुलाचे सौरव सोनवणे यांचे नाव जाणीवपूर्वक या प्रकरणात ओढले जात असल्याचा गंभीर आरोप केला. “जर चौकशीत माझा किंवा माझ्या मुलाचा कोणत्याही प्रकारचा सहभाग आढळला, तर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आम्ही कायद्याचा पूर्ण आदर करतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदार सोनवणे यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला. “काही घटक जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी या घटनेचा वापर करत आहेत. जर चौकशीत आमचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले, तर खोटे आरोप करून वातावरण बिघडविणाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केली. “पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि सत्य जनतेसमोर यावे, हीच आमची ठाम भूमिका आहे,” असे त्यांनी शेवटी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवाळीच्या पार्टीत चेतनला भेटले, जवळीक वाढली, मग ‘स्क्रिप्टेड’ मंगेतराची हत्या: पोलिसांनी सिया गोयलचा लोहगडचा...

0
पोलिसांनी दावा केला आहे की आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली भेट २०२५ मध्ये दिवाळी मेळाव्यात झाली आणि हळूहळू त्यांच्यात जवळचे...

महिला पोलीस हवालदार सुरेखा गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती; कर्तव्यनिष्ठेचा गौरव पुणे

0
पुणे जिल्हा मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहीदास कदम, आळंदी देवाची आळंदी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दिघी-आळंदी वाहतूक शाखेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. कर्तव्यदक्ष महिला...

घनसावंगीत शेतकऱ्याला मोठा फटका! शिवणगाव शिवारातून ७.५ एचपीची मोटार चोरी

0
घनसावंगी तिर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव शिवारात एका शेतकऱ्याची ७.५ एचपीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. आधीच...

कोण होता केतन अग्रवाल? सक्सेस ग्रुप डायरेक्टर आणि वर-वधू यांची लोहगड ट्रिप शोकांतिकेत संपली

0
पुण्यातील २६ वर्षीय उद्योजकाचा लोहगड येथे दुर्दैवी मृत्यू झाला पुणे: अलीकडच्या काही दिवसांत समोर आलेल्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये केतन विशाल अग्रवाल वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये...

पुण्यातील लोहगड किल्ला हत्या: केतन अग्रवालचे वडील म्हणतात की त्यांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला,...

0
'तिला लग्न करायचं नसतं तर ती नकार देऊ शकली असती': केतन अग्रवालचे वडील पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालला त्याची मंगेतर सिया गोयल आणि...

Translate »
error: Content is protected !!